सासवड प्रतिनिधी - हवेली पुरंदर तालुक्यातील समस्या सोडण्या ऐवजी राजकारण सुरू करू नका लोकांच्या समस्याकडे लक्ष द्या तुम्ही सत्ताधारी आहात सत्ताधारी म्हणून तुम्ही जबाबदारीने कामे केले पाहिजेत असा सूचक टोला भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल ताई दगडे यांनी आमदार जगताप यांना लगावला.
कोविड केअर सेंटर दुरवस्था, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई आदी संवेदनशील मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींना टोचत आहेत. सध्या पुरंदरमध्ये महाविकास आघाडीने एकत्र येऊन करोना रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील मतभेद हा संपवण्यासाठी आता अजित पवार व सुप्रिया सुळे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत; अन्यथा भविष्यात महाविकास आघाडीतील सवतासुभा प्रकर्षाने चव्हाट्यावर येणार आहे, हीच वादळापूर्वीची शांतता आहे.
सर्व सामान्य जनतेच्या भावनांशी खेळू नका अन्यथा याचा वाईट परिणाम होऊ शकतो मतदार संघातील समस्या खूप बिकट होत चालल्या आहेत कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात खूप पेशंट वाढत आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे टेस्टिंग किती होतात स्वॅप किती लोकांचे जातात त्यांना हॉस्पिटलच्या सुविधा मिळतात का हे सगळं सोडून सत्ताधारी मंडळी मात्र वेगळ्याच दुनियेत आहे असे या माध्यमातून दिसून येते अशी टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल दगडे यांनी केली