पुणे

भारतीय जनता पार्टी अशा कार्यकर्त्यास मोठी संधी देईल : महापौर मुरलीधर मोहोळ

राजेश शृंगारपुरे 459397   07-01-2021 08:31:04

बाणेर प्रतिनिधी : लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लहू बालवडकर सोशल वेलफेअर’ तर्फे बाणेर-बालेवाडी येथील निराधार व विकलांग नागरिकांसाठी घरपोच अन्नसेवा “नित्य पुण्यपर्ण” व प्रभागातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

हा सोहळा महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, उद्योजक गणेश गायकवाड, तुकाराम सुर्वे, गणेश जगताप, सचिन दळवी यांची प्रमुख उपस्थितीत बालेवाडी येथे पार पडला. या वेळी सभागृह नेते पदी निवड झाल्याबद्दल गणेश बिडकर याचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बोलताना सांगितले की, वाढदिवस साजरा करतांना सामजिक भान राखून सामजिक स्वरूप असणारा वाढदिवस साजरा करत आहे. त्या मार्फत निराधार लोकांसाठी अन्न व रुग्णवाहिका असे सामजिक विधायक उपक्रम राबविले जात आहेत, असे उपक्रम न थांबता राबवण्यात यावेत. अगदी करोना काळात देखील चांगले उपक्रम लहू बालवडकर यांनी राबवले. समाजात काम करून पक्षाची ताकद वाढवणारा प्रत्येक कार्यकर्ता संघटनेला हवा असतो. लहू बालवडकर हा पक्षाची ताकद वाढवणारा कार्यकर्ता आहे, यापुढेही पक्ष लहू बालवडकर सारख्या कार्यकर्त्याला निश्चित मोठी संधी देईल या साठी आम्ही प्रयत्न करू असेदखील आश्वासन पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर अण्णा मुळे सांगितले.

सभागृह नेते गणेश बिडकर या प्रसंगी म्हणाले की, लहू बालवडकर सारखा चांगला कार्यकर्ता भाजप ला मिळाला. वाढदिवसाला फटाके न वाजवता गोर गरीबासाठी अन्नाची निकड असणाऱ्या लोकांना रोज अन्न पुरविण्याचं काम हे खूप महत्त्वाचे महत्त्वाचे आहे.

लहू बालवडकर यांनी प्रास्ताविक करताना सांगीतले की केवळ मित्रांच्या आग्रहाने लहू बालवडकर सोशल वेलफेअर च्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. अशीच विविध समाज उपयोगी कामे येथून पुढेही करण्यात येणार आहे. या विविध समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये मिळणारी मित्रांची साथ खूप महत्त्वाची आहे.

यावेळी लहू बालवडकर यांच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ सभागृहनेते गणेश बिडकर प्रकाश तात्या बालवडकर युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या हस्ते करण्यात आले.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



लोकांच्या प्रतिक्रिया


🌍 Hello World! https://national-team.top/go/hezwgobsmq5dinbw?hs=301fe55629cc0834b29616210c876433 🌍 29-06-2023 02:02:26

ku2b27

🎁 Get free iPhone 15: http://flexmake.com/uploads/go.php 🎁 hs=301fe55629cc0834b29616210c876433* 27-11-2023 07:43:59

hb5iq4


तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.