पुणे प्रतिनिधी | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर टीका करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनावर जोरदार निशाणा साधला आहे.
सामनाने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे त्याचा विचार करावा?,
संजय राऊत नी राहुल गांधींना दररोज मुजरा करावा
असं गणेश भेगडे म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
शिवसेना संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी अभिवादन केलं नव्हतं. यावरून भेगडे शिवसेनेला टोला हाणला आहे.
दरम्यान, शिवसेनाप्रमुखांना जयंती दिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर, असं शब्दात भेगडे सेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.