भाजपा नेहमीच शिवाजी महाराजांना विरोध करणारी पार्टी
हडपसर प्रतिनिधी ::: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं.
यावर हडपसर शिवसेनेच्या वतीने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.
त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, "महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे."
यावर हडपसर शिवसेनेच्या वतीने नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले की, राज्यपाल किंवा भारतीय जनता पार्टी ही नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे पार्टी आहे अनाजी पंत ज्या भूमिकेत होते त्याच भूमिकेत राज्यपाल सध्या आहेत हे त्यांच्या आजच्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे याचा शिवसेनेच्या वतीने त्यांनी निषेध केला.