पिंपरी :: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज, 11 मार्च रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प State budget सादर केला.
कोरोनाच्या तीन वर्षाच्या कालखंडानंतर आजच्या अर्थसंकल्प कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते मात्र आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ उधारीचा पाऊस व अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प म्हणावे लागेल अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली.
ते म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी आणि शेवटच्या घटकासाठी आजच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे एका विशिष्ट भागासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून जनतेचा अर्थसंकल्पात अपेक्षाभंग झाला आहे
पिंपरी-चिंचवडवासियांना देखील पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या कडून खूप अपेक्षा होत्या मात्र त्यांनादेखील भोपळा देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने आजचा अर्थसंकल्प मधून केले आहे अशी टीका यावेळी त्यांनी केली.