बुलढाणा

कधी आहे गुरु पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि पूजा विधी

उज्वल पाटील 204   29-06-2023 14:30:03

हिंदू धर्मात गुरू पौर्णिमेला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. असं म्हणतात की, पृथ्वीवर गुरू ईश्वरासमान असतो. या दिवशी आपल्या गुरूची सेवा करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.

या वर्षी 3 जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता आणि शास्त्रात वेदव्यासांना भगवान श्री गणेशाचे गुरू मानले आहे. तसेच व्यास ऋषींनी 18 पुराणांची रचना केली त्यामुळे वेदव्यास ऋषी यांचा जन्मदिवस गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या वर्षी 3 जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहे.

गुरु पौर्णिमा तिथी

गुरु पौर्णिमा रविवार , 2 जुलै रोजी रात्री 8:21 सुरु होणार असून सोमवार, 3 जुलै रोजी संध्याकाळी 5:08 पर्यंत समाप्त होणार आहे.

गुरु मंत्र

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः

गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः

गुरू पौर्णिमेला करा गुरूचे पूजन

  • गुरू पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करून घ्या.
  • त्यानंतर तुम्ही ज्यांना मनापासून गुरू मानता, अशा देवतेची किंवा गुरूची मूर्ती किंवा फोटो पाटावर मांडा त्यांची विधिवत पूजा करा.
  • तसेच त्यांना कुंकू, चंदन, फूल, फळं आणि प्रसाद अर्पण करा.
  • त्यानंतर गुरुंच्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठण करा.

 



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.