औरंगाबाद

विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे 'मुंगेरीलाल'च जास्त - मोनिका राजळे

नितीन पाटील 137   11-05-2024 16:50:14

मिडसांगवी प्रतिनिधी:- नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असे पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे 'मुंगेरीलाल'च अधिक आहेत, असा टोला पाथर्डी शेवगाव मतदार संघाचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी लगावला.

त्या आज डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील भालगाव, मिडसांगवी गावभेट करत  गावकऱ्यांशी संवाद साधत होत्या.

यावेळी झालेल्या बैठकांना गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.  जोरदार स्वागत करत सुजय विखे पाटलांना विजय पक्का असल्याचे दाखवून दिले.

"आपल्या नगरसाठी एक जागरूक, उच्चशिक्षित, विकासशील, तळमळीचा आणि आपल्या हक्काचा माणूस म्हणून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याकडे संपूर्ण जिल्हा पाहत आहेत.

मोदी सरकारच्या विकासाच्या या तिसऱ्या पर्वामध्ये सुजयदादांच्या पाठीशी लोकशाहीतील सर्वोच्च मतांची शक्ती उभी करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या," असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.

यावेळी भाजपाचे बुथ प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी झाल्या. त्यांच्याशी चर्चा झाली असता या भागात पक्षासाठी सकारात्मक वातावरण असून निश्चितपणे मोठे मताधिक्य मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.