पिंपरी चिंचवड फिल्टर मशीन बंद असल्याचे खोटे एसएमएस गुन्हा दाखल!
पिंपरी प्रतिनिधी :: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरण करुन विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी टी.सी.एल पावडर वापरण्यात येते.
नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येत असून शहरामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा व त्यामध्ये बिघाड झाल्याचे 'एसएमएस' सध्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून पाणी निर्जंतुकीकरण न करताच सोडण्यात येणार असल्याचेही त्याद्वारे सांगण्यात येत आहे.
असे एसएमएस खोटे व जाणीवपूर्वक पसरविण्यात येत असून अशी कोणतीही परिस्थिती नाही. जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर हाऊस सुरु असून नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, असे जलशुध्दीकरण केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
खोट्या 'एसएमएस' व्हायरल करणाऱ्यावर गुन्हे दाखल
शहरातील जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचे खोटे 'एसएमएस', सोशल मीडिया मेसेज करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#PCMC #PimpriChinchwad #health #water #purification #plant #medical #care #information #watersupply #waterpurification #Rumour #fakenews