Pune केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांच्या अपेक्षेनुसार, नवीन कर प्रणालीत (New Tax Regime) काही बदल करण्यात आले आहेत, तर जुन्या कर प्रणालीत (Old Tax Regime) कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.
12 लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही. भारत सरकारने 2020 मध्ये नवीन कर प्रणाली सादर केली, जी जुन्या रिजीमच्या तुलनेत अधिक साधी आणि सुलभ आहे. नव्या रिजीममध्ये फक्त NPS वर सूट दिला जाते. तर जुन्या रिजीममधून अनेक गोष्टींवर लाभ घेता येऊ शकतो.
नवीन कर प्रणालीत कर स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे करदात्यांना अधिक लाभ होणार आहे.
जुनी कर प्रणालीत कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत. म्हणून, ज्यांनी जुन्या कर प्रणालीचा अवलंब केला आहे, त्यांच्यासाठी विद्यमान नियम लागू राहतील. या बदलांमुळे करदात्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार योग्य कर प्रणाली निवडण्यास अधिक लवचिकता मिळेल.