निरोगी आरोग्यासाठी शरीरात प्रत्येक अवयव निरोगी असणे आवश्यक आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे यकृत. यकृताचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. शरीर सामान्यपणे निरोगी ठेवण्यासाठी यकृत अतिशय महत्वाचे आहे. यकृताचे कार्य बिघडल्यानंतर शरीर काम करण्याचे थांबवते. त्यामुळे दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. मात्र हल्लीच्या बिघडलेल्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, तणावपूर्ण जीवन, बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो