पुणे :: मेडिकल न्यूज टूडे नुसार शेवग्याची पाने ही मल बाहेर पडण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून काम करते. पानांच्या या गुणाला रेचक म्हणतात.
शेवग्याची पाने विष्ठेचे प्रमाण, त्यातील पाण्याचे प्रमाण आणि आतडी यांची हालचाल निश्चित करून अधिक मल बाहेर पाडण्यासाठी मदत करतात.
मधुमेह (शुगर)
शेवगा शेंगा जशा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी आहेत तसेच शेवगाची पाने देखील मधुमेह साठी उपयोगी ठरतात.
एक संशोधनात ३० महिलांनी सलग तीन महिन्यांसाठी रोज १.५ चमचा शेवग्याच्या पानाची पाऊडर घेतली. त्यानंतर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण १३.५ टक्क्याने कमी झाल्याचे आढळले.
दुसऱ्या एका अभ्यासात ६ लोकांनी काही दिवसांसाठी त्यांच्या आहारात रोज ५० मीग्रा शेवग्याच्या पानांचा समावेश केला असता त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी २१ टक्क्याने कमी झाल्याचे आढळले.
- शेवग्याच्या पानांमध्ये आढळणारे आयसोथियोसायनेट (Isothiocyanates) हे घटक मधुमेह विरुद्ध काम करतात तसेच अँटिऑक्सिडेंट म्हणून ही काम करतात.
- शेवग्याच्या शेंगांमद्धे आढळणारे क्लोरोजेनिक ऍसिड हे शेवग्याच्या पानांमध्ये सुद्धा मिळते. हे सुद्धा मधुमेह विरुद्ध काम करणारे एक कंपाऊंड आहे
संबंधित वाचा- पोटातील गॅस बाहेर कसा काढावा ?
३. वायरल इन्फेक्शन (viral infections)
शेवग्याच्या पानांमध्ये असे काही घटक आहेत जे काही विशिष्ट वायरस संक्रमानांना थांबवते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार शेवग्याची पाने HIV-1 संसर्ग (सुरुवातीचे phases) तसेच हिपॅटायटीस बी व्हायरस यांना वाढवण्यापासून थांबवतात.
अशा या अनेक गुणांनी समृद्ध असणारी शेवगाची भाजी आपण नक्कीच खालली पाहिजे. पण लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे नुकसान देखील होते. त्यामुळे आहारात शेवगा समाविष्ट करत असताना त्याचे प्रमाण नेहमी नियंत्रित असूद्या.
शेवट
शेवटी, शेवगा वनस्पतीमध्ये औषधी उपयोग आणि गुणधर्मांची यादी विस्तृत आहे. शेवग्याचे पौष्टिक मूल्य, त्याच्या अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांपर्यंत, शेवगा शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये वापरली जात आहे.
याव्यतिरिक्त, आधुनिक वैज्ञानिक संशोधनाने त्याच्या अनेक संभाव्य आरोग्य फायद्यांची पुष्टी देखील केली आहे.
तुमच्याकडे शेवगा बद्दल काही अतिरिक्त माहिती किंवा अनुभव असल्यास, कमेन्ट करून कळवू शकता.
तसेच ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की कळवा.