पुणे ::
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठे विधान केले आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एकसमान टोल पॉलिसीवर काम करत आहे.
येत्या काळात देशभरात सगळीकडे एक समान टोल आकारला जाईल, असे गडकरी यांनी सांगितले आहे.
मात्र, आता मंत्रालय नवीन प्रकल्पाला मंजुरी देऊ शकत नाही. त्यामुळे १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे प्रकल्प मंजुरी केले जातील. तर त्यापेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागेल. सध्या ५०-६० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवले आहेत. लवकरच या प्रकल्पांवर काम सुरु होईल, या आर्थिक वर्षात महामार्ग मंत्रालय २०२०-२१ या आर्थिक वर्षातील दररोज ३७ किमी महामार्ग बांधकामाचा विक्रम ओलांडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.