पुणे::
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याभोवती वादळ फिरत आहेत. वाल्मिक कराडला या प्रकरणी अटक केली असून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातोय.
९२ रुपयांची बॉटल २२० रुपयांना
"नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय, असं म्हणत अंजली दमानिया यांनी या उत्पादनांची मूळ ऑनलाईन किंमत पत्रकारांना दाखवली अन् हे उत्पादन विकत घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी वाढीव पैसे आकारल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, हे उत्पादने इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो एरियाचा १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या" असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.