सातारा

धनंजय मुंडेचा रडीचा डाव; आरोप केले म्हणून कोर्टात खेचणार

शिंदे राम 54   04-02-2025 19:48:35

Dhananjay MUNDE on Anjali Damania : राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झडत आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी हे प्रकरण उचलून धरत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना चांगलेच धारेवर धरले आहे.त्यात आज अगोदर दमानियांची पत्रकार परिषद आणि त्यावर मुंडेनी देखील पत्रकार परिषद घेतली मात्र त्यांचे हे परिषदांचे सत्र आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणे सुरूच आहे.काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

 

कृषी विभागातील वस्तुंची खरेदी निविदा प्रक्रिया नियमांना धरुनच असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.अंजली दमानियांचे आरोप सनसनाटी निर्माण करणारे आणि धादांत खोटे असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. हे सगळं केवळ बदनामीसाठी सुरु आहे. दमानियांनी खोटं बोलणं थांबवावं असंही ते म्हणाले.

 

कृषी विभागातील खरेदी किंमत दमानियांना विचारून सरकारने ठरवायची का? असा सवाल धनंजय मुंडेंनी केला. अंजलीताईंनी केलेला एकतरी आरोप कुठेतरी टिकलाय का? दमानियांच्या बुद्धीची कीव करावी का? असाही खोचक सवालही धनंजय मुंडे यांनी विचारला.

 



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.