नंदुरबार

Bmw वाकडमध्ये बीएमडब्ल्यू कार जळून खाक

शिंदे राम 12   05-02-2025 09:36:44

वाकड (livemaharashtra.co.in):- वाकड परिसरात एका बीएमडब्ल्यू (BMW) आलिशान कारने अचानक पेट घेतला आहे. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली.

बीएमडब्ल्यू (BMW) कार चालक सयाजी हॉटेल जवळून पुणे शहराकडे जाणाऱ्या सर्विस रोडने जात असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान कारचालकाने वेळीच आपली कार भर रस्त्यात थांबवून, कारमधून बाहेर पडल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला आहे.कारला आग लागल्याची माहिती पिंपरी-चिंचवड शहर अग्निशमन दलाला मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहचून कारला लागलेली आग आटोक्यात आणली आहे. मात्र रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या BMW कारणे नेमकं कशामुळे पेट घेतला? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. यावेळी बघ्यांनी मात्र एकच गर्दी केली होती.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.