■ पाटोदा (गणेश शेवाळे) आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त युवानेते राज खवळे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले तसेच गो शाळेला चारा व ऊसतोड मजुरांना थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणुन ब्लॅंकेट वाटप करुन पारगाव घुमरा येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. पारगाव घुमरा येथील युवानेते राज खवळे यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा होत याही वर्षी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात वेगवेगळ्या उपक्रमाने विविध ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे.पारगाव घुमरा येथील युवानेते राज खवळे यांनी यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच गोशाळेला चारा व ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेट वाटप करून आपल्या नेत्याचा सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला यावेळी लोकनेते सुरेश आण्णा धस यांचे कट्टर समर्थक युवानेते अभिजीत घुमरे संकेत घुमरे,बापूराव भोसले, विकास घुमरे,भैय्या घुमरे, जयप्रकाश घुमरे, विठ्ठल घुमरे, ओमकार घुमरे, विजय घुमरे, अजिंक्य घुमरे,ओमकार पारडे, भैरवनाथ साठे, वैभव वारभुवन, आशुतोष वारभुवन व सुरेश आण्णा धस समर्थक सर्व शिक्षक तसेच कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.