नंदुरबार

पीकविमा घोटाळ्याची केंद्राकडून चौकशी होणार

शरद लाटे 55   05-02-2025 11:28:18

Dhananjay Munde तत्कालीन शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना राज्यात ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता.

तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांनीही ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य केले असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत मांडला. त्यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली.Dhananjay Munde

आधीच वाल्मीक कराडचे खंडणी प्रकरण, सरपंच खूनप्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. बीडचे पालकमंत्री असताना त्यांनी डीपीसीत मंजूर केलेल्या ८०० कोटींच्या कामांच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. आता केंद्राच्या चौकशीचा ससेमिराही धनंजय मुंडेंच्या मागे लागला आहे.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.