सोलापूर

Suresh Dhas यांनाच 'एसआयटी'च प्रमुख करा"; लक्ष्मण हाकेंची मागणी

शिंदे राम 10   05-02-2025 12:27:08

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या ( Stantosh Deshmukh murder case) प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे, तर या घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार आहे

या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण सुरु असल्याचं हाके म्हणालेत. मनोज जरांगे आणि सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

 

तसेच वाल्मिक कराडला यामध्ये अडकवलं जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनाच ‘एसआयटी’च प्रमुख बनवा असं म्हणत त्यांनी धस यांना टोला लगावला आहे.

"मंत्री धनंजय मुंडे निवडून येऊ नये म्हणून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रयत्न केले. अजूनही ते मुंडे मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. आम्ही ओबीसींनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे, मुख्यमंत्री पण आम्हीच केलं आहे," असा दावा लक्ष्मण हाके यांनी बोलताना केला आहे. 

या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाककेला आहे.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.