नंदुरबार

Pune | हडपसरला नवीन मेट्रो मार्गिका, मुख्य शहराशी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने प्रवास होणार वेगवान...

शिंदे राम 81   05-02-2025 16:27:19

पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक व खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळाली आहे. तसेच हडपसर सासवड रोड, हडपसर लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर झाल्या आहेत.

या मार्गामुळे हडपसरमधून मुख्य शहरासाठी कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या नवीन मेट्रो मार्गिकांमुळे हडपसर मतदारसंघात मेट्रो जाळे पसरणार असल्याने नागरिकांना प्रवास सुखकर आणि वेगाने होणार असल्याचा दावा या मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी केला आहे.

विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनची बैठक पार पडली. पुणे शहराचा एकत्रित वाहतूक आराखडा बनवण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. याच संदर्भात या आराखड्यामध्ये नवीन मेट्रो मार्ग व त्याची व्यवहार्यता यासंबंधी शक्यतांचा विचार करत शहरात येत्या काही वर्षात कशाप्रकारे वाहतूक वाढ होईल व ती कोणत्या भागांमध्ये असेल अशा एकूण माहितीचे संकलन करण्यात आले आहे. याबाबत आराखड्याचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत तुपे सहभागी झालो. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हडपसरसाठी नवीन मेट्रो मार्गिका मंजूर झाल्या. त्यामुळे तुपे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

तुपे म्हणाले की, पुलगेट ते कात्रज आणि हडपसर ते सासवड अशा दोन मार्गिका वाहतूक आराखड्यासाठी सुचविण्यात आल्या होत्या. कात्रज ते कोंढवा बु, खडी मशीन चौक, कोंढवा खुर्द, लुला नगर मार्गे पुलगेट असे असा मार्ग असेल. तर हडपसर ते लोणीकाळभोर, हडपसर ते सासवड रस्ता, फुरसुंगी स्टेशन पर्यंत मार्ग असणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रो मार्गिकांमुळे खडकवासला ते लोणीकाळभोर, कात्रज, हडपसर मार्गे खराडी तर दुसरीकडे सासवड रोड (फुरसुंगी) पर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मतदारांना निवडकीच्या वेळी मतदारसंघात मेट्रोचे जाळे निर्माण केले जाईल, असे वचन दिले होते. ते आता पूर्ण होताना दिसून येत आहे. बैठकीत केलेल्या सूचना मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नवीन मार्गिकांसह मेट्रो जाळे निर्माण होऊन हडपसरकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार आहे. असे तुपे यांनी सीविक मिररला सांगितले.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.