नांदेड

बीड पुन्हा हादरलं! दिवसाढवळ्या गुंडागर्दीचा धक्कादायक प्रकार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नितीन देशपांडे 88   06-02-2025 11:20:21

Beed (livemaharashtra.co.in.)

मसाजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची (Murder Case) चर्चा ताजी असतानाच, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

बीड शहरातील मोमिनपुरा (Mominpura) भागात दिवसाढवळ्या गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. मोहम्मद खलील राशिद (वय अंदाजे २५-३०) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. नजीब खान उस्मान खान, खिजर खान शरीफ खान यांच्यासह काही जणांनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी एकाच गल्लीत राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोरील रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती. या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील राशिद यांनी केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही संपूर्ण घटना 19 जानेवारी 2025 रोजी हॉटेल शालीमारमध्ये (Hotel Shalimar) घडली. या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्यात (Peth Beed Police Station) आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (Beed News)



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.