पुणे :: (livemaharashtra.co.in)
मनोज जरांगे पाटील यांनी डबल इंजिन सरकारला मोठा इशारा दिला आहे. आपल्याला हलक्यात घेण्याची चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, असा सज्जड दम त्यांनी भरलेला आहे.त्यातच आता त्यांचा मेहुणा विलास खेडकर याला जालना प्रशासनाने तडीपार केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे समाजासाठी रान करणारे जरांगे पाटील आणि दुसरीकडे वाळू चोरीत त्यांचा हा मेहुणा अडकल्याचे समोर आल्याने चर्चा होत आहे.
जालना प्रशासनाचा वाळू माफियांना दणका
जालन्यात मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि मोठ्या गुन्हेगारावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. रात्री उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. यामध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यासह ९ आरोपीवर वाळूच अवैध उत्खनन, वाळू चोरी, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, जाळपोळ आणि सरकारी कामात अडथळा या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांना जिल्हा प्रशासनाने काल जोरदार दणका दिला.