रत्‍नागिरी

अतिक्रमण कारवाईचा धडाका , 42 एकरमधील 222 बांधकामांवर हातोडा

नितीन देशपांडे 27   09-02-2025 14:20:16

Pune 

कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना दिलेली सहा दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने शनिवारी (दि. 8) पहाटेपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली.

शनिवारी दिवसभरात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तब्बल 42 एकरमधील 18 लाख 36 हजार 532 चौरस फुटांवरील 222 बांधकामांवर कारवाई केली. कारवाईविरोधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. तसेच या भागातील इंटरनेट सेवा बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष कारवाईस्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रशासनाला सूचनादेखील केल्या. या कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, अजिंक्य येळे, किशोर ननवरे आदी अधिकारी सहभागी झाले होते.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.