चंद्रपूर

सीडीआर'ची तपासणी केल्यास आणखी गुन्हेगार समोर येतील धनंजय मुंडे देखील : संदीप क्षीरसागर

शरद लाटे 13   10-02-2025 16:03:25

बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. आरोपी विष्णू चाटे याचा मोबाइल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

त्यामुळे लोकांमध्ये संशय वाढत आहे. जोपर्यंत त्याच्या मोबाइलचा सीडीआर तपासला जाणार नाही, तोपर्यंत यात आणखी गुन्हेगार आहेत का?, त्यांचा रोल समजू शकणार नाही. सीडीआर तपासल्यास आणखीन गुन्हेगार समोर येतील, असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. ते रविवारी (ता. नऊ) बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संदीप क्षीरसागर यांनी वाल्मीक कराड यांना राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची मदत मिळत असल्याचा आरोप केला. वाल्मीक कराड एकटा पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला थांबविण्याचे काम करू शकत नाही. त्याला धनंजय मुंडे यांनी सहकार्य केले आहे. पुण्यातील रुग्णालयात वाल्मीक कराड याला कोणी दाखल केले होते, याचा तपास करा. पुण्यातून फरारी झाल्यानंतर वाल्मीक कराड कुठे गेला,

सीसीटीव्ही फुटेज आहे. त्या अनुषंगाने तपास करून ज्यांनी कराडला मदत केली त्यांना पण या गुन्ह्यात आरोपी केले पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविले पाहिजे. मी पहिल्या दिवसापासून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो, की खंडणी आणि हत्या हे एकच प्रकरण आहे. संतोष देशमुख यांचा खून हा खंडणीमुळेच झालेला आहे. विष्णू चाटेच्या मोबाइलमध्ये नक्कीच कुणाचे तरी रेकॉर्ड आहेत.

यावर नक्की कुणाचा वरदहस्त हे तपासले पाहिजे. मी यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून वेळोवेळी या प्रकरणात तपास करण्याची मागणी केली आहे, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.