गोंदिया

अखेर ८२ दिवसानंतर गुन्हा दाखल !

नितीन देशपांडे 8   12-02-2025 11:15:22

कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड वर अखेर गुन्हा दाखल 

विधान सभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले आहे.विषय राजकीय मला बोलण्यात काही महत्वाचे नाही परंतु मी श्री मोहन रामा दांडगे वय 28 बक्कल नंबर 2056 यांना फिर्यादी होण्यासाठी तब्ब्ल 82 दिवसाचा प्रवास करावा लागला. ऐका पोलीस कर्मचारी यांना गुन्हा दाखल करायला तब्ब्ल  82 दिवस लागतात? माझे केलास फड शी काही वैर नाही.आणि ते त्यांचा मुलगा अजून लहान आहे त्याच्याशी पण नाही,आणि राजेसाहेब देशमुख व एडवोकेट माधव जाधव यांच्याशी काही नात नाही.परंतु तो जो प्रकार होता,तो केलास फड त्यांचं एक कार्यकर्ते म्हणून नेत्यासाठी काम करत होते, मग ते कायद्यात राहून असो,की कायदा तोडून. त्यांची भावना त्यांच्या नेत्यांच्या सन्मान विजयी करण्यासाठी होती, परंतु त्यावेळी झालेली मारहान,आणि पोलीस अंगरक्षक दांडगे यांना केलेली दडपशाही,आणि त्यांना गुन्हा दाखल करण्यास लागलेला विलंब, हे दर्शवतो.पोलीस, प्रशासन, निवडनुक अधिकारी तुम्हाला भारत सरकार, राज्य सरकार परीक्षा घेऊन पात्र करते,ते संविधान जिवंत ठेवन्यासाठी. त्या माधव बप्पा ला मारहाण झाली,त्या दिवशी पण देशात कायदा होता, फक्त काल गुन्हा दाखल झाल्यामुळे तो जिवंत झाल्याचा आज 82दिवसानंतर भास होतोय,मी जाणीव पूर्वक जबाबदारी ने सांगतोय या बीड जिल्हातील शासकीय व लोकप्रतिनिधी जातीवाद संपला पाहिजे.बाकी गोरगरीब राहतेत गुण्या गोविंदाणे, आजच भागलं उद्याच भाकरीच काय म्हणून.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.