धुळे

सुषमा स्वराज’ ई व ऑडिओ बुकचे प्रकाशन

नितीन देशपांडे 9   13-02-2025 13:30:43

‘ 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मेधा किरीट लिखित ‘अग्निशिखा : सुषमा स्वराज’ या ई-बुक व ऑडिओ बुकचे प्रकाशन झाले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या पुस्तकातून सुषमा स्वराज यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.

सुषमा स्वराज अभ्यासू, व्यासंगी आणि प्रभावी नेत्या होत्या. त्यांच्या भाषाशैलीत विलक्षण प्रवाह होता. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी अनेक सुधारणा केल्या, जे आजही मार्गदर्शक ठरतात. हे पुस्तक त्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाला माजी खासदार किरीट सोमय्या, मराठी अभिवाचक तनुजा राहणे, पुस्तक रचनाकार स्वाती जोशी, हिंदी अभिवाचक दिव्या शारदा व झंकार स्टुडिओचे संचालक उपस्थित होते.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.