पुणे::
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे आमनेसामने आले आहे. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले होते.
पण मुंबईत दोन्ही नेत्यांची गुप्त भेट झाल्याची बातमी समोर आली. पण, मी कुणाचाही गुप्तभेट घेतली नाही, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला.
भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली, असल्याचं सुरेस धस म्हणाले आहे.
पण, धनंजय मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. "मी कुणालाही भेटलेलो नाही. डोळ्याच्या सर्जरीमुळे मी विश्रांती घेत होतो. काल मी पहिल्यादा अजित पवार यांना भेटलो. त्या व्यतिरिक्त मी कुणाचीही गुप्त भेट घेतलेली नाही" असं धनंजय मुंडे म्हणाले.