कात्रज प्रतिनिधी ::-
पुण्यातील मनसेला रामराम ठोकून ठाकरे गटात वाया वंचित प्रवेश करणारे वसंत मोरे अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे (Vasant More) यांना ठाकरे गटात प्रमोशन मिळालं होतं.
सध्या वसंत मोरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वसंत मोरे व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसतायेत. वसंत मोरे एका आयोजित पार्टीत फ्रँड्री सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसले. तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला या गाण्यावर वसंत मोरेंनी ठेका धरला. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील पार्टीला उपस्थित होते. सध्या वसंत मोरेंचा व्हिडीओ अनेकांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसवर झळकताना दिसतोय. तसेच सोशल मीडियावर अनेकांनी शेअर देखील केला आहे.
पाहा Video