पुणे (Pcmctahalka.in) :: मी स्वतः व
मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांकडे बसून विधानसभा निहाय निधीचा कोटा निश्चित केला आहे. आयुक्तांकडे कामांच्या याद्या दिल्या आहेत. या कामांचा समावेश महापालिकेच्या अंदाजपत्रकात होईल, याची खात्री आम्ही दोघेही दररोज करीत आहोत,'' अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दिली.
तसेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने जिल्हा नियोजन समितीची एक ताकद आपल्याला मिळाली असुन या समितीच्या माध्यमातून निधीचे मोठे घबाड आपल्याकडे येणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
पाचशे नागरिकांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमता येणार आहे. त्याच बरोबर त्यांना मोठे अधिकारीही देण्यात आले आहे. त्यामुळे हे पद आता केवळ कागदपत्रे सांक्षांकित करण्यापुरते मर्यादित नसून त्यांना अनेक अधिकार मिळणार आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीचे अंदाजपत्रक बाराशे कोटी रुपयांचे आहे. त्यातून कोणती कामे मार्गी लावायची आहेत, त्यांचे नियोजन आतापासून करावे लागेल. एक एप्रिलपासून त्यासाठी निधी येईल. महापालिकेतील नगरसेवकांनाही देखील त्याचा फायदा होईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीचे मोठे घबाड आपल्याकडे येणार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यामुळे मोठी ताकद आपल्या हाती आली आहे.''