पिंपरी प्रतिनिधी (Pimpri-Chinchwad) समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी एका मुलाखती दरम्यान औरंगजेबाच्या राज्यकारभारावर स्तुतिसुमने उधळली औरंगजेबा उत्तम प्रशासक असून औरंगजेबाच्या काळात भारताला सोने की चिडिया म्हटलं जात होतं असं वक्तव्य त्यांनी केलं या वक्ताव्याचा निषेध भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला.
यावेळी काटे म्हणाले की; समाजवादी पक्षाची मानसिकता नेहमी देशविरोधी राहिली आहे. देशविरोधी शक्ती अशा लोकांच्या छत्रछायेखाली फोफावतात. त्यामुळे अशा लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. मुघल आक्रमकांनी भारताच्या संस्कृतीला हानी पोहोचवली, मात्र भारतीय संस्कृतीने सदैव जगाला मार्गदर्शन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही अबू अजमी यांच्यासह अखिलेश यादव यांनी देखील नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे अन्यथा पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी यावर अधिक आक्रमक होताना दिसून येईल; चिंचवडचे आमदार शंकर शेठ जगताप व भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे, पिंपरीचे आमदार अमित गोरखे व आमदार उमाताई खापरे हे ही मागणी प्रभावीपणे महाराष्ट्र विधानसभेत व विधान परिषदेत मांडणारच आहेत मात्र त्यांच्या नेतृत्वात आम्ही शहरात आंदोलन छेडू असा इशारा देखील शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिला आहे.