नांदेड

खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच बीड पोलिसांकडून गुन्हा

शरद लाटे 128   10-03-2025 12:26:23

Beed news (बीड) 

खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच बीड पोलिसांकडून गुन्हा 

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईने शिरुर गावातील दिलीप ढाकणे यांच्यासह त्याचा मुलगा महेश ढाकणेला मारहाण केली होती.मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. त्यातच ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station)गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ढाकणे पिता-पुत्रावरच गुन्हा दाखल

दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा 19 फेब्रुवारीला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती देखील ढाकणे पिता-पुत्राने यापूर्वी व्यक्त केली होती. आता ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच पोक्सोअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.