चंद्रपूर

Maharashtra Budget 2025 : 64 हजार 755 कोटींचा समृद्धी महामार्ग, काम किती

शिंदे राम 33   10-03-2025 16:22:40

मुंबई :: 

अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा अजित पवार यांनी केल्या. ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.विधानभवनामध्ये उपमुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्गाशी संबंधित माहिती दिली.

'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी ६४ हजार ७५५ कोटी रुपये इतका खर्च झाला. इगतपुरी ते आमणे हा ७६ किमी लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. या महामार्गाजवळ अ‍ॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार आहेत. त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज, पॅकिंग तसेच निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील', असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

'मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा यातील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होईल. परिणामी प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल', अशी माहिती अजित पवार यांनी दिली. यासोबत त्यांनी मुंबई उपनगरातील प्रकल्पांवरही त्यांनी भाष्य केले.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.