लातूर

आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा अन् कागदपत्रे; 18 पालकांवर गुन्हा

शिंदे राम 58   11-03-2025 10:14:39

पुणे - 

शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीईचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही तुमच्या पाल्यांना आरटीईद्वारे प्रवेश घेत असताना बनावट कागदपत्रे जोडणार असाल तर आता पालकांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.पुण्यात अशा अठरा पालकांविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवले आहेत. शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत माताळवाडी भूगाव येथे घडला आहे. पालकांनी पाल्यांना ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून बनावट कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये या पालकांचे बिंग फुटले आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चंद्रकांत भोसले (34), खंडू दिलीप बिरादार (33), रामकृष्ण तानाजी चोंधे (40), सुमित सुरेश इंगवले (34), विजय सुभाष जोजारे (34), मंगेश गुलाब काळभोर (43), रोहिदास मारुती कोंढाळकर (36), श्रीधर बाबुराव नागुरे (38), बाबासाहेब छबुराव रंधे (40), विलास रामदास साळुंखे (34), गणेश राजाराम सांगळे (35), रुपेश बाळकृष्ण सावंत (38), दिगंबर पंडित सावंत (40), चंदन अंकुश शेलार (44), कुंभराम सांगिलाल सुतार (33), मंगेश झगुलाल गुरव (33), विवेक जयवंत जोरी (30), उमेश हिरामण शेडगे (40) अशी गुन्हा दाखल झालेल्या पालकांची नावे आहेत.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.