पुणे

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली विशेष मुलांसोबत होळी साजरी

शरद लाटे 30   15-03-2025 12:07:10

पुणे (livemaharashtra.co.in) महाराष्ट्रात होळी आणि धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिक धुलिवंदनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. होलिका दहनानंतर आज दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळवड साजरी केली जाते.

दरम्यान, पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे‘ चे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीदेखील सहभाग घेत भोई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी गेली तीस वर्ष झाले पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये अनाथ, एचआयव्ही बाधित, मतिमंद, दिव्यांग, रेल्वे फलटावर बूट पॉलिश करणारे, देवदासी भगिनींची मुलं, डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या मुलांचाही सहभाग असतो.

भोई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक मुरली अण्णांकडून कौतुक

पुण्यामध्ये अशा उत्सवांमधून एक सामाजिक भाव जपला जातो. संवेदनशीलपणाने असे उत्सव साजरे गेले जातात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, माझे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीम च्या माध्यमातून विशेष मुलांसाठी त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात.

अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांचे आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने सण उत्सव हा नसतो किंबहुना त्यांना साजरा करता येत नाही नशिबाने त्यांच्यावरती ही परिस्थिती असते. पण भोई प्रतिष्ठान गेली तीस वर्षे झाले त्यांच्यासोबत अनेक उत्सव साजरं करत आहे.

मी दरवर्षी या सोहळ्याला उपस्थिती लावतो. आमच्या शहराचे एक वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये एक समता आहे विश्वबंधुत्व आहे. त्यामुळे सर्वांना मनापासून मी आजच्या या उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि विशेष करून डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीम कौतुक केलं पाहिजे. पण समाजात ज्यांना कोणी त्यांच्यासोबत हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न भोई करतात आणि आम्हालादेखील संधी देतात. त्यासाठी त्यांचे आभार. अशा शब्दात मंत्री मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.