पुणे (Pune)
27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे.संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र आहेत. नागपूर महानगर पालिकेत 4 टर्म नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष, महापौरपद भूषविले आहे. संघटनेत विविध जवाबदारी संदीप जोशी यांनी सांभाळल्या आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यात संदीप जोशी सक्रिय आहेत.
दादाराव केचे हे आर्वी मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. दादाराव हे केचे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. दादाराव केचे यांचे तिकीट कापून सुमित वानखेडे याना आर्वी मधून संधी देण्यात आली होती. आता, दादाराव केचे, संदीप जोशी यांचे भाजप कडून राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे.