रायगड

दोघांची घनिष्ट मैत्री, बायकोचं मित्रासोबतच 'झेंगाट'

शिंदे राम 221   24-03-2025 13:44:30

भंडारा : विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली समोर आली आहे. पत्नीचे मृतकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्यातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. ही तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात आज सायंकाळी घडली.

अंकुश साठवणे (वय-३८) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.अंकुश हा देव्हाडी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. तर, मुन्ना बिरणवार (वय-३२) असे आरोपीचे नाव आहे. तुमसर पोलिसांनी आरोपी मुन्ना बिरणवार याला चाकूसह ताब्यात घेतले आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मात्र, आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले होते. दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झाले होते. दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही अंकुश साठवणे याच्या घरी एकत्र आले होते.

मात्र, आरोपीने जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूने अंकुशावर सपासप वार करायला सुरुवात केली. अंकुश साठवणे यांच्यावर चाकुने हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षा धावून आली. यात ती ही जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहे.

#Bhandara #Crime #CrimeNews  #News #latestnews #latestupdates #marathinews #marathiupdates #newsupdates



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.