चंद्रपूर

Kedar Jadhav : केदार जाधव क्रिकेटच्या मैदानातून राजकीय आखाड्यात, या पक्षात प्रवेश करणार

शरद लाटे 81   08-04-2025 09:01:37

पुणे- 

माजी क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) आता राजकीय इनिंग सुरू करण्यास सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या मैदानातून थेट तो राजकीय आखाड्यात एन्ट्री घेणार आहे. केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

केदार जाधव याने या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलारांचीही भेट घेतली होती. त्यावेळी केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

 

या आधीही अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला होता. मोहम्मद अझरुद्दीन आणि गौतम गंभीर हे खासदार राहिले होते. आता त्याच पावलावर पाऊल टाकण्यास केदार जाधव सज्ज झाला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्याचा प्रवेश असल्याची माहिती आहे.

 



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.