पुणे (Georai Beed Accident)
मुलीला भेटण्यास जाण्यासाठी बसच्या प्रतिक्षेत बसलेल्या शेतक-यास भरधाव वेगातील कारने धडकल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी गेवराईतील पाथर्डी-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर घडली.गोवर्धन भीमराव जंगले(वय ६५)रा.भेंड खुर्द ता.गेवराई जि.बीड असे या दुर्घटनेत मृत झालेल्या शेतक-याचे नाव आहे.रविवारी आज सकाळी मुलीस भेटण्यासाठी गोवर्धन जंगले हे विशाखापट्टणम-पाथर्डी राष्ट्रीय महामार्गावरील भेंड खुर्द फाट्यावर साईट पंख्यावर बसले होते.सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गेवराईहून माजलगाव कडे येत असलेल्या आज्ञात कारने जोराची धडक दिली.
यात ते गंभीर जखमी झाल्याने जवळील नागरिकांनी बीड जिल्हा रुग्णालयात नेत असताना उपचारास दाखल करण्यापुर्वी गोवर्धन जंगले यांचा मृत्यू झाला.दरम्यान याबाबत सायंकाळपर्यंत पोलिसांत गून्हा दाखल झाला नव्हता.