भंडारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमान कारक शब्द वापरणाऱ्या महिला विरोधात गुन्हा दाखल

नितीन देशपांडे 72   30-05-2025 17:05:41

पुणे- पुण्यातील मार्गासा हाइट्स मध्ये राहणाऱ्या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करून अपशब्द व शिवीगाळ केली आहे त्या विरोधात काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतविरोधी विधाने करणाऱ्या महिलेविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.पुणे शहरातील महंम्मदवाडी परिसरातील मारगोसा हाइट्स सोसायटी येथे वास्तव्यास असलेल्या फराह दिबा नामक महिलेविरोधात भारतविरोधी आणि पंतप्रधानांविरोधातील आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर महिला सोसायटीतील महिलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर भारतविरोधी भावना भडकावणारे संदेश, तसेच पंतप्रधानांविषयी अत्यंत अवमानकारक आणि अशोभनीय विधाने सातत्याने करत होती. यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता व सामाजिक सलोख्यावरही परिणाम होण्याची शक्यता होती.या प्रकाराची गंभीर दखल घेत, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले. त्यानंतर सोसायटीतील विविध रहिवाशांनीही स्वतःच्या नावाने लेखी तक्रारी सादर केल्या. या सर्व तक्रारींच्या आधारे भारतीय दंड संहिता कलम 152, 196, 197, 352 आणि 353 अंतर्गत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “कोणताही भारतीय नागरिक अशा देशविरोधी आणि राष्ट्रनायकांविरोधातील विधाने सहन करणार नाही. शिवसेना म्हणून आम्ही भारतीय अस्मिता आणि पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा तीव्र निषेध करतो व कायद्याच्या माध्यमातून कठोर कारवाईची मागणी करतो.”

सदर प्रकरणाची पुढील चौकशी काळेपडळ पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.