पुणे प्रतिनिधी :: आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे ॲक्टिव मोडवर पहिला मिळाले.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले की, संघटनात्मक मोर्चेबांधणीवर भर दिला असून, केंद्र व शिंदे सरकारच्या योजना शहरातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प पुणे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे शिवसेना शहरप्रमुख यांनी दिली.
लवकरच कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.
यावेळी संपर्कप्रमुख अजय बापू भोसले, युवा सेना सचिव किरण साळी, पुणे यूवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, पुणे शहर शिवसेना महिला संघटिका पूजाताई राऊत, निलाताई पानसरे, सचिन खेडेकर, आदि उपस्थित होते.
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी केंद्र आणि राज्यातील शिंदे सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा ओहापोह केला. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक, एसटीमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट, जलजीवन मिशन, जलयुक्त शिवार, झोपडीधारकांना अडीच लाखांत घरे देण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, 100 रुपयांत आनंदाचा शिधा, पीएमआरडीएची निर्मिती, वारकाऱ्यांसाठी सोयीसुविधा अशा निर्णयांचा उल्लेख करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामगिरीबाबत नागरिकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले.