यश कथा

निगडी येथे प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन

शरद लाटे 8   06-02-2025 10:38:49

विश्वकर्मीय समाज पिंपरी चिंचवड शहर सामाजिक संस्था व सकल विश्वकर्मीय समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवानिमित्त  भव्य रथयात्रा व मिरवणूक सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायं ५ ते ८ या वेळेत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार,तांबट या विश्वकर्मीय समाजाचे प्रतीक असलेल्या पंचरंगी ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
 
 
मानकर पुढे म्हणाले कि, सदरील मिरवणुकीचा मार्ग आकुर्डी खंडोबा मंदीर चौक ते प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानगर निगडी या मार्गाने असणार आहे. या भव्य दिव्य रथयात्रा व मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये वारकरी संप्रदायांमधील परंपरा जपत जवळजवळ 150 वारकरी विद्यार्थी टाळ आणि मृदुंगाच्या नादामध्ये नामघोष करत या मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. या मिरवणुकीच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, सामाजिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण व आर्थिक सक्षमीकरण तसेच इतर बाबतचे प्रबोधन या मिरवणुकीच्या माध्यमातून  करण्यात येणार आहे. महाप्रसादाचे स्थळ प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानगर निगडी येथे असणार आहे.


आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.